Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋतुजा लटके यांच्याकडे किती संपत्ती आहे?

Webdunia
शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (19:17 IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना-भाजपा युती अशा दोन गटात अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपा-शिंदे गट युतीकडून मुरजी पटेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
 
ऋतुजा लटके यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते मैदानात उतरले आहेत. तर मुरजी पटेल यांच्यासाठी भाजपा-शिंदे गटाने शक्तीप्रदर्शन केलं असून रिपाईच्या कार्यकर्त्यांनीही यात सहभाग घेतला.
 
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि म्हणूनच संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष आहे.
 
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांनी त्यांचं निवडणूक शपथपत्र सादर केलं आहे.
 
त्यानुसार, ऋतुजा लटके यांच्याकडे एकूण 43 लाख 89 हजार 504 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 51 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
 
ऋतुजा लटके यांचे पती स्वर्गीय रमेश लटके यांच्या नावावर 22 लाख 58 हजारांची जंगम मालमत्ता, तर 8 कोटी 3 लाखांची स्थावर मालमत्ता आहे.
 
ऋतुजा लटके यांच्या शपथपत्रात काय?
ऋतुजा लटके यांचं 2021-22 मधील उत्पन्न 3 लाख 99 हजार रुपये.
हातातील रोख रक्कम 75 हजार रुपये
वेगवेगळ्या बँकांमध्ये 3 लाखांच्या ठेवी
शेअर्स आणि मुच्युअल फंडातील गुंतवणूक - 5 लाख 98 हजार
राष्ट्रीय बचत योजना, डाक योजना व इतर योजनांतील गुंतवणूक - 11 लाख 11 हजार 142
एकूण जंगम मालमत्ता 43 लाख 89 हजार 504 रुपये. यात सोनेचांदी व मौल्यवान वस्तू- 11 लाख 48 हजार
स्थावर मालमत्ता - 51 लाख रुपये किंमतीची
ऋतुजा लटके यांच्यावरील वेगवेगळ्या बँका पतसंस्थांचं कर्ज - 15 लाख 29 हजार
पती रमेश लटके यांच्यावरील कर्ज - 2 कोटी 4 लाख
ऋतुजा लटके कोण आहेत?
ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व मतदारसंघाचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
 
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली.
 
परंतु ही घोषणा होण्यापूर्वी ऋतुजा लटके या कधीही राजकारणात सक्रिय नव्हत्या.
मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ 3 कार्यालयात त्या कार्यकारी सहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनी आपल्या या पदाचा राजीनामा दिला.
 
ऋतुजा लटके या राजकारणात नव्हत्या पण त्यांचे पती रमेश लटके या मतदारसंघात दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत रमेश लटके विजयी झाले.
 
2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी यांचा पराभव केला तर 2019 मध्ये ते शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले.
 
रमेश लटके आमदार होण्यापूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. 1997 ते 2012 या काळात ते तीन टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यामुळे रमेश लटके या मतदारसंघात जवळपास गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सक्रिय आहेत.
 
रमेश लटके यांची मतदारसंघावर चांगली पकड असल्यानेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आल्याचं जाणकार सांगतात.
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनात 17 विधेयके मंजूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांना खास भेट

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनात 17 विधेयके मंजूर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांना खास भेट

जर्मनीतील ख्रिसमस मार्केट हल्ल्यात 7 भारतीय जखमी, भारताकडून तीव्र निषेध

गडचिरोलीत वंचित बहुजन आघाडीचे जोरदार निदर्शन,अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

IND vs AUS: कर्णधार रोहित सराव दरम्यान जखमी गुडघ्याला दुखापत

पुढील लेख
Show comments