Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शंभर वर्षांपासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल! जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

Webdunia
शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (08:18 IST)
कोपरगाव -- तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने १९०८ पासूनचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत. ‘संवत्सर’ शाळेने राबविलेला हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
 
‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील ८ जिल्हा परिषद शाळा आहेत. ‘संवत्सर’ व उर्वरित ८ जिल्हा परिषद शाळांनी १९०८पासून ते आजपर्यंत प्रवेश घेतलेल्या १५ हजार १७४ विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटलरित्या जतन करून ठेवले आहेत. पुण्याच्या ‘ई-प्रशासन सॉफ्टवेअर’ या कंपनीच्या मदतीने ‘संवत्सर’ शाळेने जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविला आहे. ह्या उपक्रमाचे प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
 
या उपक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, शालिनीताई विखे-पाटील यांचे पाठबळ लाभले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून लोकसहभाग उपलब्ध झाला आहे. ‘संवत्सर’ शाळेचे मुख्याध्यापक फैयाजखान पठाण यांच्यासह इतर आठ शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे विशेष योगदान लाभले आहे. संवत्सर गावातील शाळेत ६८५२, दशरथवाडी-२४६५, निरगुडेवस्ती-२००८, परजणेवस्ती-११७१, कोद्रेवस्ती-१४१०, बिरोबा चौक- ५२०, औद्योगिक वसाहत-२१०, मनाईवस्ती -४१७ व वाघीनाला -११२ असे एकूण १५१७४ दाखल ऑनलाईन झाले आहेत.
 
डिजिटल दाखले मिळवितांना शाळेतील एक क्रमांकाच्या रजिस्ट्ररमधील सर्व नोंदी स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्ये साठवल्या आहेत. त्यानुसार ज्या माजी विद्यार्थ्याला त्याचा दाखला हवा आहे. त्या व्यक्तीचे नाव, आडनाव अथवा शाळा सोडल्याचे वर्ष (माहित असल्यास)या तीनपैकी एक पर्याय टाकल्यास त्या नावाच्या व्यक्तींची नावे समोर येतात. ज्या नावाचा दखला हवा आहे. त्या नावावर क्लिक केल्यास काही क्षणात दाखला तयार होऊन त्याची प्रिंट काढता येते. तसेच दाखल्यातील नोंदी तपासवच्या असतील तर लगेचच रजिस्टरमधील पूर्वीच्या नोंदीचा फोटो समोर येतो. त्यातून दुरूस्तीदेखील करता येते.
 
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमाचे कौतुक – डॉ. वेणूगोपाल राव यांचे अध्यक्षतेखाली लोकसभेच्या ११ खासदारांच्या संसदीय स्थायी समितीने शाळेला भेट दिली आहे. राज्याचे तत्कालीन प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी शाळेला भेटी दिल्या आहेत. सध्याचे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २३ डिसेंबर, २०२१ रोजी या शाळेला भेटी दिली होती. त्यावेळी त्यांच्याहस्ते काही माजी विद्यार्थ्यांना डिजिटल दाखल्याचे वितरण ही करण्यात आले. त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले आहे.
 
‘‘शाळा सोडल्याचा दाखला डिजिटलरित्या जतन करून ठेवण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. संवत्सर शाळेला नुकतीच भेट देऊन हा उपक्रम जाणून घेतला आहे. संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून जीर्ण अभिलेखे अतिशय अल्प खर्चात जतन करण्यात आले आहेत. यामुळे वेळ व श्रम दोन्हींची बचत होत आहे. जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये ही असा उपक्रम राबविता येणे शक्य आहे.’’
– आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा! चुकीची पाण्याची बिले माफ केली जातील.

भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती,घेतला मोठा निर्णय

मुंबईमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे दिला घटस्फोट, पोलिसांनी पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला

LIVE: भाजप प्रदेश कार्यकारिणीने पालकमंत्रीपदाची निवड जाहीर केली

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू;

पुढील लेख
Show comments