Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हुश्श........मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या क्राँक्रिटीकरणाला सुरुवात

Webdunia
बुधवार, 13 डिसेंबर 2023 (21:21 IST)
मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या क्राँक्रिटीकरण कामाला अखेर सुरुवात झाली आहे. विरार-खानिवडे टोल नाक्यापासून मुंबईच्या दिशेने दुरुस्ती काम करण्यात येत आहे.वसई जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाकरता नोव्हेंबर महिन्यात विरार येथे आले असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर ते तलासरी या दरम्यानचा रस्ता १२ पदरी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. या कामासाठी ६०० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली होती.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग बांधला तेव्हापासून येथे प्रचंड अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे नाव मी ‘डेथ ट्रॅप ठेवले होते. येथे खूप अपघात होतात. त्यामुळे १२१ किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदाबाद महामार्ग सिमेंट काँक्रिटचा करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली होती.
 
या अंतर्गत नागरिकांच्या सुविधेसाठी ६ अंडरपास १० फूट ओव्हर ब्रिजसुद्धा करण्यात येणार आहेत. या कामाचा खर्च ६०० कोटी रुपये एवढा आहे. प्रस्तावित दिल्ली-मुंबई महामार्गदेखील वसईशी जोडला जाणार आहे. यामुळे वसईकरांना थेट मुंबईत जाता येईल, असेही ते म्हणाले होते.
 
दरम्यान, पावसाळ्यात महामार्गाची दुरवस्था झाली होती. वरसोवा पूलापासून वसईच्या हद्दीत अनेक भागात पावसाचे पाणी साचून महामार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प होत होती. पावसाळ्यात मोठाले खड्डे पडल्यानंतर वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत होता. अवघ्या पाच-सात किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल चार-पाच तास लागत होते.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

लहान मुलीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक

रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 1.31 केली कोटींची फसवणूक

दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले अखिलेश यादव जाहीर सभेला संबोधित करणार

अंबरनाथमध्ये पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी फरार आरोपीला वाराणसी येथून अटक

आता पगारातून TDS कापला जाणार नाही, हे काम करावे लागणार

पुढील लेख
Show comments