Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करून गौप्यस्फोट करणार

Webdunia
गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (08:40 IST)
मी कडवा शिवसैनिक असून शेवटपर्यंत भगव्याशी बेईमानी करणार नाही. मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा करून गौप्यस्फोट करणार आहे, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी बुधवारी येथे सांगितले. 
 
कदम यांची अलिकडेच एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेत उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांची रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील रिसॉर्ट आणि बंगल्याची माहिती रामदास कदम यांनी त्यांचे पीए प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिल्याचा गंभीर आरोप माजी आमदार संजय कदम यांनी केला होता. पुराव्यादाखल त्यांनी ऑडियो क्लिपही सादर केली होती.
 
त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कदम यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीमुळे कदम यांना मुंबईतून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार नसल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क येथे आलेल्या  कदम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments