Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IIM मुंबईत सुरू करणार

Indian Institute of Management
Webdunia
शनिवार, 15 जुलै 2023 (21:46 IST)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मुंबईत सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी IIMबाबत निर्णय घेण्यात आला. हे विधेयक केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकाला मंजुरी देण्यात येणार आहे.
 
पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग या संस्थेत आयआयएम सुरू करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एमबीएच्या जवळपास साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. देशातील 21 आणि महाराष्ट्रातील दुसरी IIM शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या IIMकडे पाहिलं जाणार आहे.
 
देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबई नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत असते. तसेच वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येते. त्यानंतर यावर विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर आता हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.
 

Edited By - Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बीडमध्ये सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या,पीडितेच्या आईने उपमुख्यमंत्री शिंदेंना लिहिले पत्र

हिंदी भाषेच्या वादात आरएसएस उतरणार, मनसेने मोहन भागवतांना लिहिले पत्र

LIVE: जालन्यात 'शिव महापुराण' दरम्यान मंडप कोसळला,25 जण जखमी

निवडणुका आणि ईव्हीएमबाबत खोटे दावे केल्याबद्दल रणजित कासलें यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, 3 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले

पुढील लेख
Show comments