Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक शहरातील सर्व व्यावसायिकांसाठी महत्वाची बातमी.. नियम मोडल्यास…

Webdunia
बुधवार, 9 जून 2021 (09:52 IST)
लग्न समारंभ करताना व दुकाने अस्थापना सुरू असताना कोविड-१९ विषयक मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
 
कोविड-१९ विषयक मार्गदर्शक सुचना निर्देश देण्यात आले असून त्याचे तंतोतंत पालन नागरिकांनी करावे असे आवाहन मनपाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार लग्नसमारंभ सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थित करण्यास परवानगी असणार आहे. त्यासाठी विभागीय अधिकारी स्थानिक पोलिस स्टेशन यांच्याकडून कार्यालय, हॉल,लॉन्स धारक मालक चालक यांनी रीतसर परवानगी घेणे आवश्यक असून लग्नसमारंभाच्या कमीत कमी तीन दिवस अगोदर वधू वर पक्षाने संबंधित विभागीय अधिकारी मनपा यांना रीतसर माहिती कळविणे बंधनकारक राहील.
 
तसेच परवानगी आदेशाचे पहिल्यांदा उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी यांच्या मदतीने कार्यालय, हॉल, लॉन्सधारक मालकावर २०,०००/- रुपये तर वधू-वर पक्षावर प्रत्येकी १०,०००/- असे ४०,०००/- रुपये दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधित कार्यालय, हॉल, लॉन्स कोविड-१९ अधिसूचना रद्द होईल पर्यंत अथवा पुढील आदेश होईपावेतो सीलबंद करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
 
अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सेवा,मेडिकल दुकाने, दुध ,वृत्तपत्रे विक्री, भाजीपाला व फळांचे दुकाने शासन निर्देशांचे पालन करून सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत आठवडाभर सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने व आस्थापना तसेच अत्यावश्यक सेवेत मोडत नसणारी सर्व दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत शासन निर्देशांचे पालन करून सुरू राहतील शनिवार व रविवार या दिवशी संपूर्णत: बंद राहणार आहेत. सर्व दुकाने व आस्थापना मध्ये एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ नये यासाठी विकेंद्रीकरण करणे आवश्यक असून अनावश्यक गर्दी होणार नाही दोन व्यक्तींमधील शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील.
 
प्रत्येक दुकानदार व ग्राहकाने तोंडावर मास्क घालणे सँनिटायझरचा वापर करणे इत्यादी अनिवार्य राहील.आस्थापना दुकाने अस्थापना सुरू ठेवताना कोविड-१९ विषयक मार्गदर्शक सूचना निर्देशांचे तंतोतंत पालन करावे   पहिल्यांदा कोणतेही नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास दुकानदारास ,अस्थापना चालकास ५०००/- रुपये दंड तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्राहकास अन्य व्यक्तीस १०००/- रुपये दंड करण्यात येणार आहे.
 
दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास दुकाने अस्थापना कोविड-१९ अधिसूचना रद्द होईपर्यंत अथवा पुढील आदेश होई पावेतो सील बंद करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यावर देखरेख ठेवणे कामी महापालिकेच्या प्रभाग निहाय कर्मचाऱ्यांची विभागीय स्तरावर नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments