Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लासलगाव येथे महिलेला जाळण्याचा प्रयत्न, पीडिता ४० टक्के भाजली

Webdunia
रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (09:35 IST)
हिंगणघाट प्रकरणातून महाराष्ट्र सावरत नाही तोपर्यंत लासलगावमध्येही महिलेला जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. लासलगाव येथे एका बसस्टॉपवर उभ्या असलेल्या महिलेला ४ ते ५ मुलांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ही महिला ४० टक्के भाजली आहे. दरम्यान, आरोपी रामेश्वर भागवत याला ताब्यात घेण्यात आले आहे.
 
दोनच आठवड्यांपूर्वी हिंगणघाट येथे एका तरुणीला भरचौकात पेटवण्यात आले होते. ती ४० टक्के भाजली होती. आठवडाभर मृत्यूशी झुंज देऊन तिची प्राणज्योत मालवली. आता पुन्हा असाच प्रकार  लासलगाव येथे घडला आहे. त्यामुळे महाराष्ट्र खरंच महिलांसाठी सुरक्षित राहिला आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. लासलगाव येथे एका महिलेला बस स्टॉपवर ४ ते ५ तरुणांनी पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत महिला ४० टक्के भाजली आहे. पीडित महिला ही लासलगाव जवळील पिंपळगाव नजीकच्या गावात राहणारी आहे. या महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पोलीस फरार तरुणांचा शोध घेत आहे.

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments