Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात तरुणाने आईला तलवारीने धमकावले

Webdunia
मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (17:45 IST)
मुलांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी आईवडील काहीही करतात.पण हट्ट पूर्ण केले नाही म्हणून एका 18 वर्षीय तरुणाने आईसोबत जे काही केले ते धक्कादायक आहे. 

नागपुरात एका 18 वर्षीय तरुणाने आईकडून नवीन फोन घेण्यासाठी 10 हजार रुपये मागितले आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर मुलाने चक्क आईला तलवारीने धमकावले आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सदर माहिती दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. महिला कामावरून घरी परतली तेव्हा मुलाने तिच्याकडून फोन विकत घेण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली तेव्हा आईने आर्थिक अडचण असल्याचे सांगत नकार दिला. नकार मिळाल्यावर त्याने आईसोबत  गैर वर्तन केले त्याने आई आणि  बहिणीला तलवारीचा धाक दाखवत घराची नासधूस केली. नंतर मुलगा घरातून पळून गेला .महिलेने मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाचा शोध सुरू आहे.  
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

पुणे जिल्ह्यात बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा खालावली,रुग्णालयात दाखल

LIVE: महाराष्ट्रातील या गावात बॅलेट पेपरद्वारे फेरमतदान रद्द

वायनाड भूस्खलन: प्रियंका गांधी मोदी सरकारवर आरोप करित म्हणाल्या पीडितांना केंद्रीय आर्थिक मदत मिळाली नाही

महाराष्ट्रातील या गावात बॅलेट पेपरद्वारे फेरमतदान रद्द

पुढील लेख
Show comments