Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकमध्ये आयकरची सर्वात मोठी कारवाई, तब्बल तीन हजारांहून अधिक कोटींचे घबाड सापडले

Webdunia
बुधवार, 26 एप्रिल 2023 (20:59 IST)
नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकांनी  छापे टाकले.  आयकर विभागाने  २० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर हे छापे टाकले होते. यावेळी एकूण पंधरा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती.  यात आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागल्याची माहिती समोर आली आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक दिवस-रात्र ही कारवाई करत होते. २० एप्रिलला पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुरु झालेली कारवाई २५ एप्रिलपर्यंत चालली.  यात ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी व्यावसायिकांच्या ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकले. त्यात अधिकाऱ्यांना व्यावसायिकांचे ३३३३ कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले असून साडेपाच कोटींची रोकड व दागिने जप्त करण्यात आल्याचे समजते. 
 
दरम्यान  सलग ६ दिवस ही कारवाई सुरु होती. नाशिकमध्ये राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई झाली. त्यात मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता उघड झाली आहे. राज्यातील बडे अधिकारी, व्यापारी आणि राजकीय नेते यांची यामध्ये गुंतवणूक आहे. जवळपास दीड हजार अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी केली संबंधित बिल्डरांकडे गुंतवणूक केली आहे. आयकर विभागाच्या छाप्यात बिल्डर्सचे ३३३३  कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड झाले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

मुलीच्या भावाने केले प्रियकराचे निर्घृण खून

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

भारतीय तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई, अंदमानच्या समुद्रामधून 5 टन ड्रग्ज जप्त

पुढील लेख
Show comments