Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी डॉ. पोखरणा यांना अटक !

Webdunia
मंगळवार, 1 मार्च 2022 (07:13 IST)
अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. आग प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉ. पोखरणा यांना आगीच्या घटनेस दोषी धरले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली.दरम्यान त्यांनी अटकपूर्व जामीन घेतल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
 
6 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा रूग्णलयातील अतिदक्षता विभागाला आग लागली होती. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख, चन्ना आनंता यांना अटक करण्यात आली होती.
 
सरकारने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. समितीने अहवाल सरकारकडे सादर केला होता. सरकारने या अहवालात डॉ. पोखरणा यांना दोषी धरले आहे. यामुळे त्यांना या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली

LIVE: विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून 17 वर्षीय मुलाची हत्या, मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक

आता नागपूर एम्समध्ये यकृत प्रत्यारोपण होणार, मंजुरी मिळाल्यानंतर सीएसआर अंतर्गत शस्त्रक्रिया होणार

Israel Hamas War: इस्रायलने हमासच्या दहशतवाद्याला गाझामध्ये ठार केले

पुढील लेख
Show comments