Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Indore-Pune Bus Accident: सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली

Webdunia
सोमवार, 18 जुलै 2022 (14:20 IST)
मध्य प्रदेशातील धार-खरगोन सीमेवर असलेल्या खलघाट येथे एक प्रवासी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नदीत पडून झालेल्या अपघातात 13जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात खालघाट संजय सेतू इथून ही बस नर्मदा नदीत  कोसळली.
 
बस इंदूरहून पुण्याला जात होती. माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह अनेक मंत्र्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मिश्रा यांनी सांगितले की, बसमध्ये एकूण 13 जण होते. सर्व 13 मरण पावले. तसेच सर्व मृतांची ओळख पटली आहे. "खलघाट इथे झालेली दुर्घटना अतिशय दु:खद अशी आहे. ज्यांनी आप्तस्वकीय गमावले आहेत त्यांच्या दु:खात सहभागी आहे. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना. प्रशासन घटनास्थळी पोहोचलं आहे. बस नदीतून बाहेर काढण्यात आली आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे. जखमींवर त्वरित उपचार सुरू व्हावेत असे आदेश दिले आहेत", असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे.
 
मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अपघातातून 15 जणांना वाचवण्यात आलं आहे. 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. MH40 N9848 या क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस सकाळी 7.30 वाजता इंदूर इथून सुटली होती.एसटी महामंडळाचे संचालक शेखर चन्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार, "इंदूर ते अमळनेर एसटी बसचा धार जिल्ह्यात नर्मदा नदीजवळ अपघात झाला आहे. नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. बाकी बचावकार्य सुरू आहे. साधारण साडेनऊ वाजता अपघात झाला. सकाळी साडेसात वाजता इंदूरहून निघाली. अमळनेर आगारात दुपारी 1-2 पर्यंत पोहचणं अपेक्षित होतं. बसमध्ये 30 ते 40 प्रवासी असण्याची शक्यता. बसची क्षमता 42 प्रवाशांची आहे".
 
खलघाट संजय सेतू दोन लेनच्या पुलावर दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटून बस नदीत कोसळली. स्थानिकांनी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. इंदूर आणि धार इथून NDRFच्या तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. बचाव आणि सुटकेचं कार्य युद्धपातळीवर सुरू आहे
 
चंद्रकांत एकनाथ पाटील (18603) या बसचे चालक तर प्रकाश श्रवण चौधरी (8755) वाहक आहेत. अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022/23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे.
 
हेल्पलाईन क्रमांक घटनास्थळ मदतीसाठी 09555899091 तसंच जळगाव नियंत्रण कक्ष 02572223180 02572217193 कक्षाचे क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 
13 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली आहे. जयपूरच्या नांगल कला गोविंदगढ येथील राहिवासी चेतन राम गोपाल, उदयपूर येथील मल्हारगढचे रहिवासी 70 वर्षीय जगन्नाथ हेमराज जोशी, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील शारदा कॉलनीतले रहिवासी 40 वर्षीय प्रकाश श्रवण चौधरी, अमळनेर येथे राहणारे 60 वर्षीय नीबाजी आनंद पाटील, पाटोदा येथील 55 वर्षीय रहिवासी कमलाबाई नीबाजी पाटील, अमळनेरचे 45 वर्षीय चंद्रकांत एकनाथ पाटील, अमळनेरचे 40 वर्षीय प्रकाश पाटील आणि अकोल्याचा 27 वर्षीय अरवा मुर्तजा बोरा, इंदूरचे सैफुद्दीन अब्बास अशा 8 जणांची ओळख पटली आहे.
 
बस नदीत कोसळल्याची  माहिती मिळताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासनाला लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. बस आणि त्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. घटनास्थळी एसडीआरएफ पाठवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. जखमींवर योग्य उपचाराची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ते खरगोन, इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. दुसरीकडे बस नदीतून बाहेर काढण्यात आली आहे.
 
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
 
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे आणि जखमींवर उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन आणि धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.
 
तसंच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची बस बुडून झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: गुरुवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली

लिलाव झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार, फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

वसईमध्ये कंपनी मालकाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Sarpanch Santosh Deshmukh murder आरोपांदरम्यान मंत्री धनंजय मुंडे म्हणाले आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

नाशिक जिल्हयात वडील-मुलाने मिळून केली शेजाऱ्याची हत्या

पुढील लेख
Show comments