Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Irshalwadi इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावकार्य थांबले !

Webdunia
मंगळवार, 25 जुलै 2023 (21:29 IST)
Irshalwadi disaster rescue work stopped  इरशाळवाडी दुर्घटनेचे बचाव कार्य रविवार दि. (23 जुलै) सायंकाळपासुन थांबवण्यात येत असल्याची घोषणा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. त्यामुळे मातीच्या चिखलात 57 लोक कायमचे गडप झाले आहे. या घटनेत 27 लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे इरशाळवाडी येथील दुर्घटनेत मृतांचा आकडा जवळपास 84 असल्याचे निश्चित होत आहे.
 
इरशाळवाडी येथील बचाव कार्याची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. यानंतर खालापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित आढावा बैठकीत त्यांनी इरशाळवाडी दुर्घटनेचे बचाव कार्य थांबवत असल्याची घोषणा केली. दुर्घटनेतून बचावलेल्या 144 लोकांच्या पाठीशी शासन ताकदीने उभे आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाडया आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या असल्याची माहीती त्यांनी दिली.
 
पालकमंत्री ना.उदय सामंत म्हणाले की, इरशाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील 43 घरे मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहेत. वाडीतील 228  इतकी लोकसंख्या होती. यापैकी या दुर्घटनेत 27 लोक मृत्यूमुखी, 57 लोक बेपत्ता असून 144 लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात  आले आहे. तसेच त्यांना लागणार्‍या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत..
 
या कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडको मार्फत सदर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच आ.महेश बालदी यांनी विधानसभेत आयुधाद्वारे दिलेल्या माहितीनुसार 5 वाड्यांचे आणि जिल्ह्यातील 20 धोकादायक गावांचे  पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही श्री.सामंत यांनी सांगितले. या दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफर, इमॅजिका कामगार, सिडकोचे कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनधी असे एकूण जवळपास 1 हजार 100 लोकांनी उत्तमरित्या कामे केले त्यांचे शासनामार्फत आभार मानले.
 
भविष्यात अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून शासन व जिल्हा प्रशासन खबरदारी घेईन असेही श्री.सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. याठिकाणी काही ट्रेकर्स, पर्यटक, काही लोक येथील झालेली घटना बघण्यासाठी येण्याची शक्यता आहे. याठिकाणी जिल्हा प्रशासनाने 144 कलम लागू केले आहे. तरी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आ.महेश बालदी, आ.महेंद्र थोरवे, विभागीय आयुे डॉ.महेंद्र कल्याणकर, विशेष पोलीस निरीक्षक प्रविण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बढे , एनडीआरएफ कंमाडर श्री.तिवारी उपस्थित होते.
 
इर्शाळवाडी दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रराज्य विधान परिषद  उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी केले. या मुलांशी संवाद साधताना डॉ. गोर्‍हे यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले. काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्याकरिता स्वत...चा नंबर अनाथ मुलांना दिला.
 
तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी मुलांना केली. दुर्घटनाग्रस्त ईर्शलवाडी मध्ये एकूण 1 ते 18 वयापयरतचे 31 मुल- मुले असून त्यापैकी 21 जण आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन या  स्वयंसेवी संस्थेने या इर्शाळवाडी दुर्घटनेतील या अनाथ मुलांचे पालकत्व स्विकारले आहे. ही मुले 18 वर्षाचे पूर्ण होईपयरत त्यांच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी संस्थेने घेतली असून त्यांच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण करण्यात येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: देवेंद्र फडणवीसांची पक्षनेतेपदी निवड केली जाईल म्हणाले सुधीर मुनगंटीवार

लातूर मध्ये जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक

काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुणे न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल! आज ना उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार

'देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री', शपथविधीपूर्वी नागपुरात लावले पोस्टर्स

पुढील लेख
Show comments