suvichar

नोटाला मिळालेली मते भाजपने फोडली म्हणणे चुकीचे आहे

Webdunia
सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (07:41 IST)
पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. ऋतुजा यांनी केवळ बहुमतच मिळाले नसून दिवंगत पती रमेश लटके यांचा विक्रमही त्यांनी मोडला आहे. या निवडणुकीत नोटालाही जास्त मिळाली. नोटाला १२ हजारांपेक्षा अधिक मत मिळाली आहेत, यावरुन आताल आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नोटाल मिळालेली मतं ही भाजपचीच असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही भूमिका मांडली. तसेच, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे सामंत यांनी म्हटलं आहे. 
 
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी नोटाला मिळालेल्या मतावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तर, भाजप नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी विजयानंतर ऋतुजा लटके यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच "भाजपाच्या मदतीमुळे ऋतुजा लटकेंचा अंधेरी पूर्वमध्ये विजय" असंही म्हटलं आहे.
 
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार लटके 66 हजारांच्या वर मते घेत निवडून आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत नोटाला 12 हजारांच्या वर मते मिळाली आहेत. भाजपने ही मते पैशाने फिरवली असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, नोटाला मिळालेली मते भाजपने फोडली म्हणणे चुकीचे आहे, या मतांची टक्केवारी पाहता सर्व पक्षांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असे सामंत यांनी म्हटले. तसेच, मी लटके यांचे अभिनंदन करतो, असेही सामंत म्हणाले. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

"बाबा, मला वाचवा..." २० मिनिटांनंतर २१ वर्षीय इन्फ्लुएन्सरच्या मृत्यूची बातमी आली; हुंड्यासाठी हत्येचा आरोप

अकोल्यात पारा ४६.३ अंश सेल्सिअसवर पोहोचला, २३ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा

युद्ध थांबणार? अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर इराण पाऊल मागे घेण्यास तयार; ट्रम्प यांच्याकडूनही कराराचे संकेत

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने नागपूर आणि चंद्रपूरमध्ये छापे टाकले

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने नागपूर आणि चंद्रपूरमध्ये छापे टाकले, आतापर्यंत १० जणांना अटक

पुढील लेख
Show comments