Dharma Sangrah

नागपूरच्या RSS मुख्यालयावर आतंकी हल्ल्याची आशंका, जैश -ए-मोहम्मद च्या संघटनेकडून रेकी ,मुख्यालयाची सुरक्षा वाढवली

Webdunia
शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (19:57 IST)
पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद भारतात सातत्याने कट रचत असते. सध्या नागपुरातून मोठी बातमी येत आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने नागपुरातील अनेक भागात रेकी केल्याचं सांगण्यात येत आहे. नागपुरातील अनेक  ठिकाण मोहम्मदच्या रडारवर असून नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय रेशमबाग येथील हेडगेवार भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

<

Maharashtra | Yesterday, we received info that a few Jaish-e-Mohammed terrorists conducted a recce of some places in Nagpur. We have registered an offence under the Unlawful Activities (Prevention) Act, it is being investigated by the Crime Branch: Nagpur Police Commissioner pic.twitter.com/s1idwLxMJS

— ANI (@ANI) January 7, 2022 >नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून जैश-ए-मोहम्मदच्या काही दहशतवाद्यांनी नागपूरच्या काही भागात रेकी केल्याच्या बातम्या येत होत्या. याबाबत पोलीस सक्रिय झाले आहेत. आम्ही बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे, त्याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे. सुरक्षेबाबत ते म्हणाले की, नागपुरातील महत्त्वाच्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच लोकांना सावधगिरी पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागपुरातील अनेक भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
तसेच नागपुरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख
Show comments