Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्रकार परिषदेत आव्हाडांकडून शिवीगाळ

पत्रकार परिषदेत आव्हाडांकडून शिवीगाळ
Webdunia
शुक्रवार, 9 जून 2023 (07:42 IST)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेताच थुंकले होते. त्यानंतर संजय शिरसाट यांचं नाव घेतल्यावरही थुंकले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, पत्रकार परिषद घेत असताना आव्हाडांचा संयम सुटला आणि त्यांनी शिवीगाळ केली.
१ जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल
 
गाझीयाबाद येथील एका पोलीस अधिकाऱ्याने मुंब्रा येथे ४०० मुलांचे धर्मांतर करण्यात आले असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र, विकसीत होत असलेल्या मुंब्य्राला बदनाम करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनिश सेठ आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सत्य जाहीर करावे. अन्यथा, येत्या १ जुलैला मुंब्रा बंद करण्यात येईल, असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
मुंब्र्याला बदनाम करण्याचा प्रकार
 
महाराष्ट्रात जे काय सुरू आहे ते शासन पुरस्कृत दंगली होत आहेत. कालच गाझियाबादमधील एका आयपीएस अधिकाऱ्याने घोषित केले की मुंब्र्यामध्ये ४०० मुलांचे धर्मांतर केले. हा मुंब्र्याला बदनाम करण्याचा प्रकार तर आहेच, त्यासोबत हिंदू धर्माला बदनाम करण्याचा विषय आहे. हिंदू धर्माचे मुलं एवढे मूर्ख आहेत का धर्मांतर करायला? त्या आयपीएस अधिकाऱ्याने पेपरवर आकडा सांगावा. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी आहे. त्या आयपीएसने ४ नावं दाखवावी. याची दखल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी घेतली पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आव्हाडांचा संयम सुटला
 
हिंदू धर्माचा अपमान करणारे हे कोण लोक आहेत? ४०० मुलांचं धर्मांतर केल्याचा दावा करत आहात. चार मुलं दाखवा, मी राजीनामा द्यायलाही तयार आहे, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे त्याचवेळी त्यांचा तोल सुटला आणि त्यांनी शिवीगाळ केली. मुंब्रा, ठाणेमध्ये एखादी अफवा सोडायची, शहरात हवा सोडायची आणि त्यातून जातीय दंगल घडवायची, असा माझा आरोप आहे. त्यांनी धर्मांतर करणारे ४०० सोडा ४ पोरांची नावं सांगितली “तर ***** **खालून जाईन”, अशी शिवीगाळ करत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

LIVE: उपराजधानी नागपुरात एचएमपीव्ही संसर्गाची 2 प्रकरणे

चंद्रपुरात अस्वलाची दहशत, 3 जणांवर हल्ला

HMPV भारतात पसरत आहे, नागपुरात आढळले 2 नवीन रुग्ण

महाराष्ट्रात आपले सरकार'साठी मोबाईल ॲप बनवणार- मंत्री आशिष शेलार

HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्रात अलर्ट, पुण्याच्या रुग्णालयात 350 खाटा तयार

पुढील लेख
Show comments