Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ही' केवळ अफवा, मुख्यंमत्री शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण

Webdunia
बुधवार, 6 जुलै 2022 (15:23 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्याचे फोटोही सोशल व्हायरल झाले. परंतु ही केवळ अफवा असल्याचे मुख्यंमत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
 
सन 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर वेगाने राजकीय घडामोडी घडत होत्या. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले. यात शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यानंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 39 आमदारांनी ‘उठाव’ केल्याने आघा़डी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे सरकार स्थापन झाले. पण हे सरकार लवकरच कोसळेल आणि राज्यात डिसेंबरपर्यंत मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत शरद पवार यांनी केले.
 
या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, असे वृत्त प्रसारित झाले. परंतु खुद्द एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त फेटाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments