Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वारकर्‍यांची कार्तिक वारीकडे पाठ

वारकर्‍यांची कार्तिक वारीकडे पाठ
Webdunia
गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (15:22 IST)
पंढरपूर : राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका यंदाच्या कार्तिकी यात्रेला बसला असून यात्रेकरूंच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे दिसून आले आहे.
 
भाविकांच्या निवासासाठी प्रशासनाच्या 65 एकरावरील भक्तिसागर या निवासतळावरील निम्मे प्लॉट मोकळे पडल्याने यात्राकाळात कायम गजबजलेला हा भक्तिसागर परिसर सुनासुना झाला आहे.
 
राज्यभर यंदा परतीच्या पावसाने हजारो शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर या नुकसानीचे पंचनामे अद्यापही सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याने यंदा कार्तिकी वारीकडे पाठ फिरवली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमी असूनही शहरातील सर्वच रस्त्यांवर फारशी वर्दळ नाही. ज्या भक्तिसागरमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त भाविक दरवर्षी निवास करतात तिथे केवळ 1 लाख 68 हजार भाविकांच्या निवासाची नोंद झाली आहे.
 
दिवाळीच्या सुट्टीत रोज हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणारी यात्रा विक्रमी होणार अशी अपेक्षा होती. पण परतीच्या पावसाने वारकर्‍यांनी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवल्याने व्यापार्‍यांना देखील मोठा फटका बसणार आहे. उजनीतून सोडण्यात येणारे पाणी बंद झाले असून यामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळी पुन्हा सर्वसामान्य झाली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

मुंबई: विलेपार्ले येथे क्रेननेखाली चिरडून महिलेचा मृत्यू

LIVE:26/11 हल्ल्यातील नायकाच्या सन्मानार्थ स्मारक बांधले जाणार

26/11 हल्ल्यातील नायकाच्या सन्मानार्थ स्मारक बांधले जाणार,महाराष्ट्र सरकारने जाहीर केले

मुंबई पोलिसांशी बोलण्याचा सल्ला देत कुणाल कामराकरिता विशेष सुरक्षेची मागणी संजय राऊतांनी केली

सैफअलीखान हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला

पुढील लेख
Show comments