Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केजरीवालांना सत्तेची नशा- अण्णा हजारे

Webdunia
बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (09:21 IST)
''दिल्ली सरकारच्या नवीन मद्यविक्री धोरणामुळे मद्यपान व मद्यविक्रीला प्रोत्साहन मिळणार आहे. एकेकाळी दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी आवाज उठवणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती'', अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले दहा वर्षांपूर्वीचे सहकारी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून खडसावले आहे.
 
मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली असल्याचा टोलाही हजारे यांनी केजरीवाल यांना लगावला आहे. हजारे यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने आपण व दिल्लीचे सध्याचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया अनेक वेळा राळेगण सिद्धी येथे आला होतात. त्या वेळी तुम्ही राळेगण सिद्धीतील व्यसनमुक्तीचे कौतुक केले होते. मात्र सत्तेत आल्यावर मात्र तुम्ही या गोष्टी विसरलात याची खंत वाटते.
 
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांबद्दल (टीम अण्णा) जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देशभर फिरून जनजागृती, लोकशिक्षण करणे अपेक्षित होते, याची आठवण अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्रात करून दिली आहे. आपण त्या मार्गाने गेला असता तर सर्वसामान्यांची कुटुंबे उद्ध्वस्त करणारे मद्यधोरण आपण राबवले नसते, असे हजारे यांनी केजरीवाल यांना उद्देशून पत्रात म्हटले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments