Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकरानं महिलेसह तिघांना संपवलं, आरोपी ताब्यात

Webdunia
शनिवार, 18 जून 2022 (08:33 IST)
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने महिलेचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर महिलेच्या दोन लहान मुलांना वेलंग गावानजीक असणाऱ्या विहिरीत ढकलून दिल्याची घटना घडली आहे. दत्ता नारायण नामदास असं संशयित आरोपीचं नाव असून या घटनेनंतर संशयित आरोपी दत्ता नामदास हा त्याच्या मूळ गावी अकलूज याठिकाणी निघून गेला होता. दरम्यान या प्रकरणात रहिमतपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दत्ता नामदास यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
संबंधित महिला ही आपल्या पतीपासून विभक्त प्रियकरासोबत राहत होती. 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि योगिता यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. जेवण झाल्यानंतर दत्ता याने योगीताचा गळा दाबून हत्या केली. यानंतर दोन मुलांना रात्री विहिरित ढकलून दिलं. समीर आणि तनु अशी लहान मुलांची नावं आहेत. हत्या करून आरोपीने वेलंग येथील राहत्या घराला बाहेरून कडी लावून अकलूजला पलायन केलं. दरम्यान हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रहिमतपूर पोलिसांना याची माहिती दिली.
 
पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदासला ताब्यात घेतलं असून मानभाऊच्या मळ्यातील विहिरीतून मुलांचा मृतदेह बाहेर काढत आले आहेत. या घटनेने सातारा जिल्हा खळबळ उडाली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments