rashifal-2026

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमणार

Webdunia
गुरूवार, 29 मार्च 2018 (09:22 IST)

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यात येणार आहे. त्याबाबतचं विधेयक बुधवारी विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले. पंढरपूर आणि शिर्डीतील मंदिराच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातही सरकारी पुजारी नेमावे यासाठी जनआंदोलन उभे राहिले होते. त्याला विधीमंडळात मंजुरी मिळाली.

ज्या पुजाऱ्यांची नियुक्ती होईल, त्यामध्ये 50 टक्के महिलांचा समावेश असेल, अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. मंजूर विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येतील. त्यामुळे पूजा करणाऱ्या व्यक्‍तींचे अनुवांशिक,संविदाकृत अधिकार नाहीसे होतील. मात्र असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्‍टात आलेल्‍या व्यक्‍तीला 90 दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्‍हा न्यायालयाकडे अर्ज करता येईल. मंदिर विश्वस्‍तव्यवस्‍थेचे व्यवस्‍थापन करण्यासाठी ‘श्री अंबाबाई मंदिर व्यवस्‍थापन समिती’ स्‍थापन करण्यात येणार आहे. या समितीत एकूण आठ सदस्‍य असतील. कोल्‍हापूर महानगरपालिकेचे महापौर हे या समितीचे पदसिदध सदस्‍य असतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

वर्धा येथील लाडकी बहीण योजना संकटात, पोर्टलच्या समस्यांमुळे लाभार्थ्यांना त्रास

१५ दिवसांत चांदीच्या किमती ५७,००० रुपयांनी वाढल्या, या शहरांमध्ये पहिल्यांदाच ३ लाख रुपयांच्या पुढे गेल्या

मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या विधानाला चोख उत्तर देत म्हटले की, विरोधक त्यांच्या पराभवासाठी सबबी शोधत आहेत

पुढील लेख
Show comments