Dharma Sangrah

सॉरी... मला माफ करा, मी चोरी करतोय!

Webdunia
कोल्हापूर- सॉरी मला माफ करा, मी चोरी करतोय, अशी चिठ्ठी लिहून एका चोराने धूम ठोकली. या चोरट्याने कोल्हापुरातील मंगळवार पेठेत, पाण्याच्या खजिन्याजवळील पशूसंवर्धन कार्यालयात चोरी केली. या चिठ्ठीची चर्चा सध्या शहरभर जोरदार सुरू आहे.
 
पाण्याच्या खजिना परिसरात पशूसंवर्धन विभागाचे मुख्य कार्यालय आहे. रविवारी येथे एक चोर शिरला. पण शासकीय कार्यालयात त्या चोरीला काय मिळाले असेल? असा प्रश्न पडला असेल. हा प्रश्न चोरालाही पडला असावा आणि म्हणून त्याने या कार्यालयातील तीन संगणक, झेरॉक्स मशीन असा सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लंपास केला.
 
आता केवळ हा चोर चोरी करून थांबला नाही, तर त्याने या कार्यालयातील एका टेबलावर सॉरी मला माफ करा, मी चोरी करतोय, अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. सोमवारी कर्मचारी कार्यालयास आल्यानंतर हा प्रकार उडघकीस आला.
 
ही चोरी एखाद्या गरजू विद्यार्थ्याने केली आहे का? असा संशय पोलिसांना आहे.
 
मजेदार बाब म्हणजे या चिठ्ठीत माफी तर मागितली आहे, मात्र त्याखाली पुढील 5 वर्षांनी परत करेन, असेही लिहिले आहे. त्यामुळे पोलिसही अवाक झाले आहेत. सध्या पोलिस चोराचा शोध घेत आहेत. मात्र, या चिठ्ठीची चर्चा कोल्हापुरात चांगलीच रंगली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेल बिल, रिक्षा भाडे आणि बस प्रवासावर विशेष सवलत मिळेल

"मी मुख्यमंत्री असताना त्यांना कधीही उपमुख्यमंत्री मानले नाही," फडणवीसांशी झालेल्या संघर्षाच्या वृत्तांवर शिंदे यांचे मोठे विधान

सावधान! मुंबईची लोकसंख्याशास्त्रीय ओळख पुसण्याचा डाव; 'व्होट बँक' की शहरावर कब्जा?

LIVE: मतदानापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार

मुंबईत एका लोकल ट्रेनला भीषण आग, ट्रेन जळून खाक

पुढील लेख
Show comments