Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापुर:गरबा खेळायला रूग्णवाहिकेतून मुलींची वाहतूक! उघडकीस आला प्रकार

Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (08:03 IST)
कोल्हापुरातील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून मोठ्या संख्येनं तरुण मुली गरबा खेऴायला जात असल्याचा व्हिडियो समोर आला आहे. या व्हिडियोने जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.
 
काल रात्री 10 वाजता हॉकी स्टेडियम ते नॉर्थ स्टार हॉस्पिटल परिसरात एका रुग्णवाहिकेने एक चारचाकी आणि दोन दुचाकींना धडक दिली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या रुग्णवाहिकेची पाठलाग करूण थांबवले. रुग्णवाहिकेच्या चालकाला जाब विचारून गाडीमधील पेशंट पहाण्यासाठी दार उघडण्यास सांगितले.
 
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या ड्रायव्हरने दार उघडले. त्यानंतर त्या रुग्णवाहीकेत एकही पेशंट नव्हते तर गरबा खेळायला गेलेल्या तरूण मुली असल्याचे आढळून आले. या मुली शासकीय मेडिकल महाविद्यालयाच्या मुली असल्याचे आढळून आले.
 
याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. असता तर या सर्व विद्यार्थिनी शेंडा पार्क इथल्या महाविद्यालयाच्या इमारतीमध्येच दुर्गा पूजेसाठी गेल्या होत्या. तिकडून परत येत असताना वाहन बिघडल्याने रुग्णवाहिकेतून आणावं लागलं असं स्पष्टीकरण देण्यात आलं. पण अशा पद्धतीने रुग्णवाहीकेतून वाहतूक करणे हा सुद्धा गुन्हाच असल्य़ाचे स्पष्टीकरण आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली असून या बाबत अधिष्ठता यांना नोटीस देखील पाठवली जाणार आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

SCO vs AUS :ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील T20 विश्वचषक सामना रविवारी, प्लेइंग 11 जाणून घ्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा खर्गे यांना सल्ला म्हणाले-

मुंबईत बायकोच्या त्रासाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

Porsche Car Crash: मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोर्श कार अपघातातील आरोपींना सोडण्यास नकार

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात मृतांची संख्या आठ वर पोहोचली

INDIA vs CANADA : ओल्या मैदानामुळे भारत-कॅनडा सामना रद्द

18 जून रोजी वाराणसीमध्ये पीएम मोदी शेतकऱ्यांसाठी 20 हजार कोटी रुपये जारी करणार

नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत आठ नक्षलवाद्यांना ठार मारले,एक जवान शहीद, दोन जवान जखमी

लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? त्याबद्दल चिंता कधी करायला हवी? वाचा

कामाचं नाटक करत, माऊस खेळवत राहाणाऱ्यांची बँकेने केली हकालपट्टी

पुढील लेख
Show comments