Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टीमेटम,आज रात्रीपर्यत वाट पाहू, उद्यापासून कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टीमेटम,आज रात्रीपर्यत वाट पाहू, उद्यापासून कारवाई
, गुरूवार, 31 मार्च 2022 (21:28 IST)
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना आता परीवहन मंत्री अनिल परब यांनी शेवटचा अल्टीमेटम दिला आहे. आज रात्रीपर्यत वाट पाहू, उद्यापासून कारवाई करणार असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच उद्यापासून एसटी धावणार असल्याचाही विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.
 
विलीनीकरणाचा मुद्दा सोडून इतर सर्व मागण्या मान्य करून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यातच परिवहन मंत्र्यांनी गुन्हे मागे निर्णय देऊन सुद्धा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच ठेवल होते. त्यात आता एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. आज रात्रीपर्यत वाट पाहणार, उद्यापासून कारवाई करणार असल्याचे परब यांनी सांगितले आहे.
 
एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले, तसेच कारवाई मागे घेण्याचे आवाहन केले, परंतू असा एक समज झालाय की प्रशासन सांगतय करत काही नाही आहे. त्यांना नोकरीची गरज नाही. वारंवार सांगुन देखील 5 महिने गैरहजर आहेत. त्यामुळे ते शिक्षेस पात्र असल्याचे अनिल परब यांनी म्हणत आता जेवढे उपलब्ध कर्मचारी आहेत त्यांना घेऊन उद्यापासून एसटी सेवा पुर्ववत करण्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.
 
11 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहोत. आणि उद्यापासून जो रूट ठरला आहे, त्या मार्गावर एसटी धावणार असल्याचे परब  म्हणाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे