Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या 51 आमदारांना भाजपसोबत जायचे होते- प्रफुल्ल पटेल

Webdunia
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी सांगितले की, ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपले गुरू मानतात.
 
शरद पवार हे आमचे गुरू आहेत
प्रफुल्ल पटेल म्हणाले, 'शरद पवार हे आमचे गुरू आहेत... आम्ही त्यांचा आणि त्यांच्या पदाचा नेहमीच आदर आणि सन्मान करू. ते आपल्या सर्वांसाठी पित्यासारखा आहे. आम्ही त्यांचा अनादर करत नसून उलट त्यांच्याबद्दलची श्रद्धा दाखवत आहोत.
 
ते म्हणाले, 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे 40 आमदारांना सुरत आणि गुवाहाटीला घेऊन गेले तेव्हा MVA सरकार पडणार हे निश्चित होते. परिणामी त्यावेळी राष्ट्रवादीच्या 51 आमदारांचा असा विश्वास होता की, आपण सरकारचा भाग व्हायला हवा. काही वैचारिक फरक नाही, कारण आपण शिवसेनेसोबत जाऊ शकलो तर भाजपसोबतही जाऊ शकतो.
 
अजित गटाला किती आमदारांचा पाठिंबा?
प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला की, आपल्या गटाला 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे आणि यात शंका नाही. ते म्हणाले, 'कौटुंबिक नात्यात राजकारण येऊ नये, अशी माझी इच्छा आहे, पवार कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो आणि मी स्वतःला पवार कुटुंबाचा एक भाग समजतो. ते स्वीकारण्याचे आवाहन आपण फक्त शरद पवारांना करू शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

LIVE: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा केली

बांगलादेशींच्या अवैध घुसखोरीवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, चार जणांना अटक

शिवराज सिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात केली पूजा, म्हणाले-नवीन वर्ष शेतकऱ्यांना समर्पित आहे

पुढील लेख
Show comments