Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोणार सरोवर परिसरात लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन

Webdunia
शुक्रवार, 3 मार्च 2017 (17:01 IST)
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर परिसरात लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  ३ मार्च रोजी पर्यटन महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाला देश-विदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली आहे.
 
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवराचे संवर्धन होण्यासाठी येथे लोणार पर्यटन महोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ५ मार्च दरम्यान चालणा-या या महोत्सवाचे उद्घाटन कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 
सुरूवातीला मातृतीर्थ सिंदखेड राजावरून लोणारला महोत्सव ज्योत आणण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी खा.प्रतापराव जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे, नगराध्यक्ष भूषण मापारी, जि.प.अध्यक्षा अलका खंडारे, डॉ.विकास आमटे, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, आ. संजय रायमुलकर यांची उपस्थिती होती. 
 
यावेळी, प्राची धुमाळ यांनी स्वागतगीत सादर केले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सादर करण्यात आले. या महोत्सवाला पर्यटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.  
 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments