Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात दारू विकत घेण्यासाठी वयाची अट किती ? आबकारी नियम माहित काय म्हणतात

Webdunia
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (15:03 IST)
Lowest age to buy alcohol मुंबईत किंवा इतर मेट्रो सिटीजमध्ये वीकेंड्सला नाईट लाईफचे वातावरण दिसून येते. शुक्रवार हा दिवस विशेषतः कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठी खूप खास आहे जे संपूर्ण आठवडा ऑफिसमध्ये काम करतात. कारण यानंतर त्यांना दोन दिवसांची सुट्टी मिळणार असते आणि म्हणूनच ते पार्टी करू शकतात. 
 
दारू हे प्रत्येक पार्टीत असतेच मात्र दारू खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की त्यासाठी वय निश्चित केलेले आहे. येथे आपण जाणून घेणार आहोत की त्याचे नियम काय आहेत?
ALSO READ: दारु किती प्रमाणात प्यावी?
मुंबईत दारू खरेदी करण्याचे वय किती आहे?
लोक सहजपणे बार किंवा पबमध्ये जाऊन त्यांच्या आवडीची दारू ऑर्डर करतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की नियम तुम्हाला तसे करण्यास परवानगी देतात का? आपल्याला माहित आहे का की मुबंईत याबाबत काय नियम आहेत? तर जर तुम्ही मुंबईत दारू विकत घेणार असाल तर जाणून घ्या इथे दारू खरेदी करण्याचे योग्य वय 25 वर्षे आहे. म्हणजेच तुमचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही मुंबईत दारू विकत घेऊ शकत नाही. हे नियम अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी आणि दारूचा गैरवापर रोखण्यासाठी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात मद्य खरेदी आणि पिण्याचे कायदेशीर वय 25 वर्षे आहे, परंतु 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक बिअर खरेदी करु आणि पिऊ शकतात. अल्कोहोल (हार्ड लिकर) पिण्याचे कायदेशीर वय 25 आणि वाईन आणि बिअर पिण्याचे कायदेशीर वय 21 असे आहे. इतर मादक पदार्थ किंवा हार्ड लिकरसाठी कायदेशीर वय 25 आहे. महाराष्ट्रात असे तीन जिल्हे आहेत ज्यात दारू पिणे आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ते आहेत- वर्धा जिल्हा, गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा.
ALSO READ: Hangover Symptoms हँगओव्हर का होतो आणि त्यावर खरोखरच काही इलाज आहे का?
इतर शहरांमध्ये वय किती आहे?
दारू खरेदी करण्याचे वय भारतातील शहरांनुसार बदलते. दिल्लीमध्ये यासाठी वय 25 वर्षे आहे, तर काही राज्यांमध्ये ते 21 वर्षे वयाचे कायदेशीर आहे. दिल्ली तसेच पंजाब, हरियाणा, पंजाब आणि चंदीगडमध्ये दारू खरेदीची वयोमर्यादा 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
 
तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमध्ये दारू खरेदीचे किमान वय 21 वर्षे आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर मद्य खरेदीसाठी वयाची मर्यादा 25 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
 
ही कागदपत्रे आवश्यक असतील- जर तुम्ही दुकानात दारू विकत घेणार असाल तर लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला तुमचे वय सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे द्यावी लागतील. यासाठी तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट किंवा इतर वय दर्शवणारी कागदपत्रे दाखवू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात दारू विकत घेण्यासाठी वयाची अट किती ? आबकारी नियम माहित काय म्हणतात

3 पुर्‍या एकत्र खाल्ल्याने मृत्यू ! डाक्टर देखील हैराण

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर फेकला मोबाईल, चेहऱ्यावर जखमा

LIVE: संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा यावर भाष्य केले

रश्मी शुक्ला होणार पुन्हा महाराष्ट्राच्या महासंचालक

पुढील लेख
Show comments