suvichar

Lumpy Skin Disease : बैलपोळ्यावर लम्पी व्हायरसचे सावट

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2023 (18:56 IST)
Lumpy Skin Disease :सध्या राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यात लम्पी व्हायरस संसर्ग रोग पसरले आहे. अनेक जिल्ह्यात या विषाणूंमुळे जनावरे दगावली आहे. आता बैलपोळाचा सण जवळ आला असून लम्पी व्हायरस हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा संसर्ग एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना लागत असल्यामुळे या रोग ग्रसित जनावराचा संसर्ग निरोगी आणि सुदृढ जनावरांना होऊ नये या साठी जनावरांना सणानिमित्त एकत्र आणू नये असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना केले आहे. 
 
सध्या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात पसरला आहे. या रोगामुळे जनावरे बाधित होत आहे. सध्या या भागात 60 च्या पुढे जनावरांना या रोगाची लागण लागली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

पशुपालन अधिकाऱ्यांनी बैलपोळ्याच्या सणाला जनावरे एकत्र न आणण्याचे आवाहन केले आहे. जेणे करून इतर निरोगी जनावरांना या रोगाची लागण लागू नये. या रोगामुळे अनेक जनावरे दगावली आहे. यंदाचा पोळा सण साधेपणाने साजरा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जनावरांचे एकत्र मेळावे आयोजित करण्यास देखील बंदी आणण्यात आली आहे. लम्पी रोगाने बाधित असलेल्या जनावरांचे विलीगीकरण करावे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 
 


Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अमेरिकेसोबतच्या चर्चेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, तेहरान दबावाला बळी पडणार नाही आणि धमक्यांपुढे झुकणार नाही

ई-केवायसी न केल्यास ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कायमचा बंद

समुद्राच्या लाटा १६ फूट उंच जाण्याची शक्यता, बीएमसीचा इशारा

LIVE: ई-केवायसी न केल्यास ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कायमचा बंद

मुंबईत पहाटे भीषण अपघात: स्पोर्ट्स बाईक'ने वृद्धाला जोरदार धडक दिली, दुचाकीवरील तरुण जोडप्याचासह तिघांचा मृत्यू

पुढील लेख