Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतदानासाठी नेटिजनचा पुढाकार

Webdunia
गुरूवार, 16 फेब्रुवारी 2017 (17:08 IST)
‘हा डाग तुम्हाला कलंकित नाही तर मानांकित करणार आहे... हा डाग चांगला आहे...’ या शब्दात ‘डीपी’ बनवून व्हॉटस्अ‍ॅपवरचे  विविध ग्रूप आणि नेटिजन मतदानासाठी नागरिकांमध्ये  जनजागृती करत आहे. महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांची सध्या रणधुमाळी शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. नाशिक शहरात महापालिका हद्दीत सुमारे साडे दहा लाख मतदार असून या मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सर्वच स्तरातून जनजगृती केली जात आहे. मतदान ही लोकशाहीची खरी ताकद असून मतदानाचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने पार पाडावे, असे अवाहन महापालिका, जिल्हा परिषद, निवडणूक आयोग, विविध सामाजिक संघटनांकडून केले जात आहे. या जागृती अभियानामध्ये सोशल मिडियाही मागे राहिला नसून मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने सध्या व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल साइट्सवरून ‘हा डाग चांगला आहे...’ अशी पोस्ट सध्या गाजत आहे. बहुतांश नेटीझन्सकडून ही पोस्ट ‘डीपी’म्हणून अपडेट करण्यात आली आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments