Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेची महाप्रबोधनयात्रा , सुषमा अंधारेंची तोफ मनमाड आणि नाशिकला धडाडणार

Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2023 (07:59 IST)
नाशिक  : शिवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा  रविवारपासून ( दि.10 ) जिल्ह्यात येत असून उपनेत्या सुषमा अंधारे यांची  तोफ मनमाड आणि नाशिक येथे घडाडणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली .
 
मनमाडमधील एकात्मता चौकात रविवारी(दि.10)जाहीर सभा तर सोमवार दि.11रोजी सकाळी 11 वाजता नाशकात शालिमार येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद आणि नंतर सायंकाळी 5 वाजता बी.डी.भालेकर मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
 
राज्यातील सध्याची राजकीय स्थिती,राज्यातील तीन पक्षांच्या सरकारमध्ये असलेला समन्वयाचा अभाव,शिवसेनेतून बाहेर पडलेले लोक, नवाब मलिकांवरून सध्या उफाळलेला वाद,अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान,आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी या पार्श्वभूमीवर त्या काय बोलतात आणि कुणावर असूड ओढतात त्याबाबत सर्वांचे उत्सुकता ताणली गेली आहे.
 
त्यांच्या दोन्ही सभा यशस्वी करण्याचा निर्धार नाशिक येथे शालिमार कार्यालयात झालेल्या  शिवसेना आणि अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
 
बैठकीस सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, गटनेते विलास शिंदे,डी.जी.सूर्यवशी,उध्दव कदम,उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी,युवासेना जिल्हाधिकारी बाळकृष्ण शिरसाठ,राहुल ताजनपुरे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,शैलेस सुर्यवंशी,विकास गिते,महिला आघाडी महानगर समन्वयक प्रेमलता जुन्नरे आणि  महानगराती शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: अकोला जिल्ह्यात गावकऱ्यांनी चार तरुणांना केली बेदम मारहाण

कमी शिजवलेले चिकन खाऊ नका ते धोकादायक आहे, अजित पवारांनी हा इशारा का दिला?

अपार्टमेंटमध्ये आढळले एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह

सातारा : परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एका विद्यार्थ्याने पॅराग्लायडिंगचा केला अवलंब

महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव सुरूच

पुढील लेख
Show comments