Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अक्कलकोटच्या राजकुमारी संयुक्ताराजे भोसले यांचे निधन

maharani of akkalkot is dead
Webdunia
शनिवार, 5 मे 2018 (12:00 IST)
अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत राजकुमारी संयु्क्ताराजे जयसिंहराजे भोसले (वय 69 वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी चार वाजता हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले.
 
त्यांची अंत्ययात्रा आज शनिवारी 5 मे रोजी दुपारी चार वाजता नवीन राजवाड्यापासून शहराच्या प्रमुख मार्गावरून निघणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर थडगे मळा (आनंद बाग) येथे सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी राजकुारी भोसले यांचे पार्थिव हे शनिवारी सकाळी 9 तेदुपारी 3 पर्यंत अंत्यदर्शनासाठी नवीन राजवाड्यात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात श्रीमंत राजकुारी सुनीताराजे भोसले ही बहीण तर श्रीमंत राजकुमार मालोजीराजे भोसले (तिसरे) हे (दत्तकपुत्र) असा परिवार आहे. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्या उच्च विद्याविभूषित होत्या.
 
संयु्क्तराराजे भोसले यांचा जन्म 5 जानेवारी 1949 रोजी झाला. स्वामी समर्थांच्या त्या निस्सीम भक्त होत्या. अध्यात्माबद्दल त्यांना विशेष आवड होती. परदेश भ्रमण त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. राजघराण्याच्या परंपरेप्रमाणे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीदिवशी पहिला अभिषेक देवस्थान आणि  समाधी मठात त्यांच्या हस्ते केला जात होता. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाणे : महिलेवर लैंगिक अत्याचार आणि छळ केल्याप्रकरणी तरुणाला अटक

ठाण्यातील प्लायवूड गोदामाला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचा जवान जखमी

मुलं लंडनला गेली आणि ड्रग्ज तस्कर बनली, नवी मुंबईतील श्रीमंत बिल्डर वडिलांची आत्महत्या

पाणीटंचाई दूर होईल,पालकमंत्री बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले कडक निर्देश

काटोल आणि नरखेड गावांचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल बावनकुळे म्हणाले

पुढील लेख
Show comments