Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळी अधिवेशनात शिंदेनी आपल्या लाडक्या बहिणींना दिले हे वचन

Maharashtra
, शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (09:25 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू असून त्यात लाडकी बहीण योजनेतून पैसे कापल्याचीही चर्चा आहे. याबाबत आता एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व भगिनींना वचन दिले आहे.  राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते..

09:29 AM, 20th Dec
देवेंद्र फडणवीसांचा दावा महाराष्ट्र यापूर्वीही पहिल्या क्रमांकावर होता, भविष्यातही राहील
राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप प्रत्येक वेळी विरोधी पक्ष करतात. पण वास्तव हे आहे की महाराष्ट्र याआधीही नंबर वन होता आणि भविष्यातही नंबर वन राहील. सर्व मिळून राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर्सची करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिली. सविस्तर वाचा 
 

09:29 AM, 20th Dec
एकनाथ शिंदे विधानसभेत विरोधकांवर निशाणा साधत म्हणाले ‘विरासत में गद्दी मिलती है, बुद्धि नहीं’
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानपरिषदेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याला प्रत्येक क्षेत्रात नंबर वन करण्यासाठी सरकार संघभावनेने काम करत आहे. तसेच लक्ष्य एकच आहे ते म्हणजे ‘मिशन समृद्ध महाराष्ट्र’. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवरही जोरदार हल्लाबोल केला. सविस्तर वाचा 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जयपूर-अजमेर महामार्गावर केमिकलने भरलेल्या टँकरचा स्फोट, 5 जणांचा मृत्यू