Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘गुगल’ क्लासरुम सुरु करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

Webdunia
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (08:50 IST)
कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली. त्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, ‘जी स्वीट’ आणि ‘गुगल’ क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
 
सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागिदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा  ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. ‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’, ‘गूगल क्लासरूम’, ‘गूगल मीट’ यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.
 
‘वर्क फ्रॉम होम’साठी सहकार्य करावे – मुख्यमंत्री
जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो असे सांगून मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले की, ‘गुगल’मुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबविताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही ‘गुगल’ने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी ‘गुगल क्लासरुम’ आणि ‘गुगल स्वीट’ च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले की ‘गुगल’च्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास यामुळे मदत होईल.
 
‘गुगल’ आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक – उपमुख्यमंत्री 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी ‘जी स्वीट’  आणि राज्य शाळांकरिता ‘गुगल क्लास’ रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.  ‘गुगल क्लास’रुममध्ये विद्यार्थी घरी बसून शिकू शकतात, ते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात,
कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांना याचा उपयोग करुन घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण यामुळे मिळण्याची सोय झाली आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
 
शिक्षणातील अग्रेसर राज्य बनविणार – शालेय शिक्षण मंत्री 
सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन,ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
‘जी स्वीट फॉर एज्युकेशन’ आणि ‘गुगल क्लास’रूम सारखे विनामूल्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि या परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करत असलेल्या सर्व शिक्षकांचे प्रा. गायकवाड यांनी यावेळी आभार मानले. आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी रजिस्ट्रेशन केले असल्याचेही त्या म्हणाल्या. गुगल सोबत शिक्षण क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासंबधी दीर्घकालीन भागीदारीची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
कोविड विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशातील सुमारे ३२ कोटीहुन अधिक मुलांच्या शिक्षणात खंड पडला आहे असे सांगुन गुगलचे भारतातील विक्री प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यास ‘गुगल’ कटीबद्ध असून राज्यासोबत सुरु झालेली ही भागीदारी भविष्यात अधिक समृद्ध होईल. जी स्वीट इंटरनेटद्वारे दिली जाणारी माहितीचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांचे शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासन करित असलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनिय आहेत असेही ते म्हणाले.
 
ठळक बाबी
• शिक्षणासाठी जी स्वीट : जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूमसह परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम करते.
• ‘गूगल क्लासरूम’ : जी स्वीट फॉर एज्युकेशन मधील एक सोपं पण शक्तिशाली साधन, जे शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात मदत करते, तसेच वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास मदत करते.
• ‘गूगल फॉर्म’ : एक सोपा प्रश्न आणि प्रतिसाद साधन जे शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी प्रश्न भरण्यास किंवा आयात करण्यास अनुमती देते.
• असाइनमेंट्स : एक असे साधन जे शिक्षकांना लवकर  आणि सुरक्षितपणे तयार करण्यास, विश्लेषण करण्यास आणि ग्रेड कोर्सवर्क करण्यास आणि विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अधिक लवचिकता प्रदान करण्यास अनुमती देते.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments