Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात २ लाख १९ हजार गुन्हे दाखल

Webdunia
सोमवार, 3 ऑगस्ट 2020 (12:03 IST)
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख १९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४६७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच १८ कोटी २४ लाख ४६ हजार १०४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १ ऑगस्ट या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ८२ हजार ५५५ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
 
पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३२४ (८८३ व्यक्ती ताब्यात)
१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०९ हजार ०६२
राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२४ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४६
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –
(मुंबईतील ५१ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५५, ठाणे शहर १२  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २, पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३, 
 
अमरावती शहर १, मुंबई रेल्वे ४, नाशिक ग्रामीण ३, जळगाव ग्रामीण १, जालना एसआरपीएफ १ अधिकारी, नवी मुंबई  एसआरपीएफ १, पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी, ए.टी.एस. १, उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १, जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, सातारा १, अहमदनगर १, औरंगाबाद रेल्वे १, एसआरपीएफ अमरावती १)
कोरोना बाधित पोलीस – २२४ पोलीस अधिकारी व १७१० पोलीस कर्मचारी
 
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments