Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Weather Update :काय म्हणता, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्‍ह्यांत अतिसतर्कतेचा इशारा

Webdunia
बुधवार, 15 मार्च 2023 (21:45 IST)
भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवारी (दि.१६) व शुक्रवारी (दि.१७) अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच १९ मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवारी ( दि.१७) अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
 
गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे‍ शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता असून, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. या काळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते. वित्त व  जिवीतहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

मंदिर-मशीद मुद्द्यावर संजय राऊत यांनी दिले मोठे विधान, मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला

LIVE: शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

शिवसेना युबीटी BMC निवडणूक एकट्याने लढवणार! संजय राऊतांनी दिले संकेत

महाराष्ट्रातील विभागांची विभागणी सरकारने अद्याप का केली नाही? आदित्य ठाकरे यांचा खुलासा

अरविंद केजरीवाल पुन्हा ईडीच्या तावडीत, निवडणुकीपूर्वी उघडले दारु घोटाळा प्रकरण

पुढील लेख
Show comments