Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनमाड :आपत्कालीन सेवा क्रमांकाचा गैरफायदा घेतला म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

Webdunia
रविवार, 17 मार्च 2024 (10:13 IST)
शहरात रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक, भारतीय खाद्य निगमचे गोदाम, शीख धर्मियांचे गुरुद्वारा, रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना आणि शहरापासून जवळच असलेले इंधन प्रकल्प यामुळे मनमाड शहर हे नेहमीच हॉटलिस्टवर असल्याने प्रशासन देखील सदैव सतर्क असते.
 
शहरातील एका घरामध्ये जबरदस्तीने दोन आतंकवादी शिरल्याची माहिती आपत्कालीन सेवा क्रमांक 112 वर दिल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. संबंधित बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने चर्चेला एकच उधान आले होते.
 
याबाबत अधिक माहिती अशी, की शहरातील रेल्वे परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 50 युनिट परिसरातून काल सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास आपत्कालीन सेवा क्रमांक 112 वर अनेक वेळा फोन करून घरामध्ये दोन आतंकवादी शिरले आहेत, तसेच मला मारहाण करून चोरी करीत आहे अशी माहिती रेल्वेच्या इलेक्ट्रिशियन विभागात काम करणाऱ्या अमोल प्रवीण वळवी (वय 40) यांनी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
 
मात्र घटनास्थळी असा कोणताही प्रकार आढळून न आल्याने मनमाड पोलीस ठाण्यात खोटी माहिती देणाऱ्या रेल्वे कर्मचारी अमोल प्रवीण वळवी याच्या विरोधात पोलीस कर्मचारी सोपान संजय मुंडे यांनी तक्रार दाखल केली असून, भा. दं. वि. कलम 177 प्रमाणे कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर करीत आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

लोकसभा निवडणूक 2024 : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात 13 सिटांसाठी मतदान

लज्जास्पद! 13 वर्षाच्या मुलाने मोठ्या बहिणीला केले प्रेग्नंट

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

मी सुटणार आहे, मला या तुरुंगात राहू द्या- अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला एनकाऊंटर होण्याची भीती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

पुढील लेख
Show comments