Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक : अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली

धक्कादायक : अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली
, सोमवार, 14 डिसेंबर 2020 (16:37 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली आहे. पाणीपट्टीची ही रक्कम २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी काढलेल्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे. 
 
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (सागर) यांचाही समावेश आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिलासा : मुंबईतील ५१७ पैकी ४६५ कोविड सेंटर बंद