rashifal-2026

ठाण्यात कारमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार

Webdunia
रविवार, 7 डिसेंबर 2025 (14:28 IST)
काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फेमिली कोर्टाच्या आवारात एका विवाहित महिलेवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेने दोघांविरुद्ध 5 डिसेंबर 2025 रोजी ठाणे नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
ALSO READ: ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक
पीडितेच्या तक्रारीवरून तिने सोशल मीडियावर जाहिरात बघून आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी तिला ठाण्यात बोलावले आणि चांगले काम देण्याचं आमिष दाखवत तिला विश्वासात घेतले. नंतर त्यांनी महिलेला एका स्पा सेंटर मध्ये काम मिळवून दिले. 
ALSO READ: ठाण्यातील घोडबंदर रोड प्रकल्प 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
घटनेच्या दिवशी 25 ऑगस्ट 2025 रोजी एका आरोपीने रात्री 8 :30 वाजेच्या सुमारास स्पा सेंटर मध्ये जाऊन महिलेकडून मसाज करून घेतला नंतर माझा वाढदिवस आहे असे सांगून महिलेला आपल्या कार मध्ये बोलावले. तिला घेऊन त्याने कार ठाणे फेमिली कोर्टाच्या आवारात नेली. आरोपीने तिथे कार थांबवली आणि केक कापला. आरोपीने केक मध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. केक खाऊन महिला बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेतच महिलेवर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. तिचे अश्लील व्हिडीओ काढले नंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास महिलेला रस्त्यावर एकटे सोडून पळून गेले. 
ALSO READ: परदेशात नोकरी देण्याच्या फसवणुकीचा मुंबईत पर्दाफाश, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त
महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवत तिला कोणालाही सांगायचं नाही गप्प राहायला सांगितले. 
व्हिडीओ व्हायरल होऊन बदनामी होईल या भीतीने महिला गप्प बसली. नंतर आरोपी तिला ब्लॅकमेल करू लागले. तिने कंटाळून 5 डिसेंबर 2025 रोजी तिने  आपल्या मैत्रिणीला आणि ओळखीच्या वकिलाला घडलेलं सर्व सांगितलं आणि पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. नगर पोलिसांनी आरोपींवर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.  
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

एफआयआरमध्ये नाव नसणे म्हणजे क्लीन चिट नाही, पार्थ जमीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका

शिवसेनेचे 22 आमदार भाजपमध्ये जाणार!आदित्य ठाकरेंच्या दाव्याने गोंधळ

इंडिगो संकट जाणूनबुजून घडवले गेले होते का? सरकारने नोटीस बजावली, चौकशी सुरू

LIVE: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

वन्यजीवांसाठी अनंत अंबानी यांना जागतिक मानवतावादी पुरस्कार, वंताराला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली

पुढील लेख