पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल गारवामुळे (त्याच्या शेजारच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे अशोका हॉटेलच्या चालकांनी एका सराईत गुन्हेगाराला सुपारी देवून हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा खून (केला. या प्रकरणातील 10 आरोपींवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 18 जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांची दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरुन येऊन वार केले. आरोपींनी रामदास आखाडे यांच्या डोक्यात, हातावर, पायावर तलवारीने सपासप वर करुन गंभीर जखमी केली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारादरम्यान 21 जुलै रोजी मत्यू झाला.
लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान आरोपी बाळासाहेब जयवंत खेडेकर यांनी त्यांच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून भाचा सौरभ उर्फ चिम्या व इतरांना दररोज एक ते दोन हजार देण्याचे सांगून खून केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय-56 रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) निखिल बाळासाहेब खेडेकर (वय-24) सौरभ उर्फ चिम्या कैलास चौधरी (वय-21 रा. अशोका हॉटेलमागे, उरळी कांचन), अक्षय अविनाश दाभाडे (वय-27 रा. सोरतापवाडी, ता. हवेली), किरण विजय खडसे (वय-21 रा. माकडवस्ती, ता. दौंड), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय-23 रा. कॅनरा बँकेचे मागे शिंदावणे रोड, उरुळी कांचन), गणेश मधुकर माने (वय-20 रा. कोरेगाव), निखिल मंगेश चौधरी (वय-20 रा. कोरेगाव. मुळ ता. हवेली), निलेश मधुकर आरते (वय-23 रा. तुकाईदर्शन, हडपसर), काजल चंद्रकांत कोकणे (वय-19 रा. इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली असून सध्या ते येरवडा कारागृहात (Yerwada Jail) न्यायबंदी आहेत. तसेच एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी हे टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गुन्ह्यातील आरोपी निलेश आरते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
तसेच इतर आरोपींवर जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, जबरी चोरी करणे, हत्यार व अग्निशस्त्रे बाळगणे असे गुन्हे हडपसर (Hadapsar) आणि लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) ठाण्यात 21 गुन्हे दाखल आहेत.