Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत “रक्षा बंधन”सिनेमा पाहिला‘

Webdunia
बुधवार, 17 ऑगस्ट 2022 (09:50 IST)
रक्षाबंधन’  हा चित्रपट रक्षाबंधनच्या दिवशी गुरुवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. या चित्रपटावर अनेक चित्रपट समीक्षकांनी तसेच कलाकारांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतंच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या ट्विटवर अक्षय कुमारनेही कमेंट केली आहे.

पंकजा मुंडे यांनी नुकतंच रक्षाबंधन चित्रपटाच्या निमित्ताने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी रक्षाबंधन चित्रपट पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया दिली आहे. “आज रक्षाबंधन…, मी आणि माझ्या बहिणी यांनी मुलांच्या समवेत “रक्षा बंधन”सिनेमा पाहीला. मला खूप भावला. समाजात अजूनही मुली व त्यांचे विवाह कठीण आहेत कारण त्यांची किम्मत मोजावी लागते. fridge,TV,गाड़ी, status या गोष्टींसाठी आपल्या लाडकीचे प्राण ही गमवावे लागतात किती दुर्दैवी आहे हे!”

“मला वाटते रक्षाबंधन सिनेमात संकल्प घेतला तसा आपण घेऊ शकलो पाहिजे. कठीण आहे, आपणच दडपणात चुकीच्या रीति पाळतो. नाते फायदा-तोटा यात बसवत असतो. जरूर आपण ही परिवाराच्या सोबत हा सिनेमा पहावा, काहीतरी सुरुवात करावी नव्या दिशा नव्या निश्चयाची ! फारच चांगला चित्रपट. फारच चांगला संदेश…अक्षय कुमार सर”, असे पंकजा मुंडेंनी ट्वीट करत म्हटले आहे.

पंकजा मुंडेंच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे रक्षाबंधन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अक्षय कुमारनेही पंकजा मुंडेंच्या या ट्विटवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देताना अक्षय कुमारने पंकजा मुंडेंचे आभार मानले आहे.

“धन्यवाद पंकजा जी, जरी आम्ही या चित्रपटाद्वारे 5% बदल घडवून आणू शकलो तरीही हा आमच्यासाठी मोठा विजय असेल”, असे अक्षय कुमारने कमेंट करत म्हटलं आहे.
 
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments