Dharma Sangrah

अमरावतीत चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दूध विक्रेत्याचा मृत्यू, आरोपीला अटक

Webdunia
शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025 (17:39 IST)
अमरावती जिल्ह्यातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शोभानगर येथे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी चाकू हल्ल्यात दूध विक्रेते आकाश नारायण कदम गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतं त्यांचा मृत्यू झाला. गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
ALSO READ: जळगाव : केंद्रीय मंत्र्यांचा पेट्रोल पंप वर दरोडा, चोरट्यांनी लाखो रुपये लुटले पण पोलिसांनी फिल्मी शैलीत ठोकल्या बेड्या
मयत आकाश हा दूध विकण्याचा व्यवसाय करायचा.मंगळवारी दूध वाटून तो शोभानगरमार्गे घरी जात असताना रस्त्यावर दुचाकीस्वार उभा होता. आकाशने त्याला बाजू होण्यास सांगितले यावरून आरोपीने त्याला शिवीगाळ केली. त्याने फोनवरून आणखी दोघांना फोन केले. 
ALSO READ: भंडारा येथे वाळू माफियांनी केला गोंदियाच्या एसडीएमवर हल्ला, आयसीयूमध्ये दाखल
दोघांनी तिथे येऊन आकाशावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला असून काही नागरिकांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याला तिथून रेफर करून खाजगी रुग्णालयात दाखल केले. गाडगेनगर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्याचे जबाब नोंदवले. या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञातांच्या विरुद्ध प्राणघातक हला केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
ALSO READ: cough syrup महाराष्ट्र एफडीएने कफ सिरपची राज्यव्यापी तपासणी सुरू केली
दरम्यान, गुरुवारी उपचारादरम्यान आकाशचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा मूळ आरोपीला अटक केली आहे. तसेच दोन्ही अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. 
Edited By - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

इंडिगोचे संकट सहाव्या दिवशीही सुरूच; विमान कंपनीने ६१० कोटी रुपये परत केले

LIVE: महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे; सरकार १८ विधेयके मांडणार

'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रास्ते योजना' ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर कोहली लंडनला रवाना; विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात परतणार

FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जर्मनीने भारताचा पराभव केला

पुढील लेख
Show comments