Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तान्ह्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे विधिमंडळात; चर्चा तर होणारच

Webdunia
सोमवार, 19 डिसेंबर 2022 (16:46 IST)
नाशिक – देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवन परिसरात आज पोहचल्या आहेत.त्यामुळेच सध्या संपूर्ण विधिमंडळात त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
 
आजपासून हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात सहभाग घेण्यासाठी आ. आहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळाला घेऊन पोहचल्या आहेत. नव्याने सुरु झालेल्या समृध्दी महामार्गावरुन प्रवास करत  त्यांनी नागपूर गाठले. त्यानंतर त्यांनी अधिवेशनात आज सहभाग घेतला. बाळ आई शिवाय राहू शकते नसल्यामुळे मी त्याला घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. देवळाली या माझ्या मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत मांडण्यासाठी मी आले आहे. त्याचबरोबर अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दलही कर्तव्य बजावणे महत्त्वाचे आहे.. त्यामुळे मी दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भाजप आज जाहीर करणार 50 उमेदवारांची पहिली यादी ! MVA मध्ये 80 जागा अडकल्या !

टोमॅटोने भरलेला ट्रक उलटल्याने लुटण्यासाठी आला जमाव, रात्रभर पोलिसांनी दिला पहारा

महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का, आचारसंहिता भंग प्रकरणी महायुतीच्या शिंदे सरकारवर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदार मुलावर महाकाल मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

धमकीनंतर अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर वाढवण्यात आली सुरक्षा

पुढील लेख
Show comments