Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करा, मनसेने केली मागणी

Webdunia
शुक्रवार, 9 जून 2017 (11:21 IST)

मुंबईतील दादर स्टेशनबाहेर असलेल्या ब्रिटिशकालीन कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.  ग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. मात्र स्थानिक रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं सांगत राज ठाकरे यांच्या मनसेने हा कबुतरखाना म्हणजे कबुतरांचं अनधिकृत खाद्यकेंद्र बंद करण्याची मागणी केली आहे.  मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना मनसेतर्फे पत्र लिहिण्यात आलं आहे. 

कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार जडल्याचं या पत्रात म्हटलं आहे. पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक इमारतींच्या खिडक्या खराब झाल्याचाही उल्लेख आहे.अनेक रहिवाशांनी त्यांना कबुतरांच्या पिसांमुळे श्वासाचे त्रास आणि अस्थमा झाल्याची तक्रार आमच्याकडे केली आहे. शहरात कबुतरांमुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यात महापालिका अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे दादरमधील कबुतरखाना बंद करण्याची मागणी आम्ही करत आहोत’, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रात म्हटलं आहे.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments