suvichar

मनसेकडून 'या' भेटीसंदर्भात स्पष्टीकरण दिले

Webdunia
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (22:06 IST)
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा  खासदार उदयनराजे भोसले हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या भेटीला आले होते. आता, मनसेकडून या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरुन कृष्णकुंजवरील भेटीचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. 
 
उदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचीही भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही उदयनराजे मराठा आरक्षणासंदर्भात भेटले होते. 
 
उदयनराजे भोसले यांनी कौटुंबिक लग्न सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटी दरम्यान उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच कृष्णकुंजवर आल्याने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला, अशी माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आलीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments