मुंबईला पाणी पुरवठा करणा-या प्रमुख धरणांपैकी एक असलेला मोडक सागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. शनिवारी सकाळी 6.32 वाजता मोडक सागर धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. या तलावातून मुंबईला दररोज 455 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत. दरम्यान अन्य तलावांतही पाण्याची पातळी वाढत असल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन लवकरच मिटणार आहे.