Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगण्यासाठी पैसे नसल्याने आईने दोन मुलीसह घेतला चुकीचा निर्णय

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2023 (19:32 IST)
राज्यातील अनेक जिल्ह्यात कौटुंबिक आणि आर्थिक गुंतागुंतीचे प्रश्नामुळे अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात गोरेगाव या गावात देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. आईसह दोन मुलींनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचना निर्माण झाल्याने आता जगायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर या आईने आपल्या दोन मुलींसह मृत्यूला कवटाळले आहे. अक्षरशः हृदय हेलावून टाकणारी ही घटना घडली आहे.
 
वहिनी मला माफ करा, मी तुम्हाला बोलले पण माझ्याकडून होत नाही, मी दोन मुलींना घेऊन रेल्वे खाली आत्महत्या करायला जात आहे मोहनमुळे, असा मेसेज करून या महिलेने दोन मुलींसह आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मोहनला इकडे येऊन रूम सोडायला सांगा आणि माझे जे काही देणे आहे ते त्याला द्यायला सांगा असाही उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला होता.

या मेसेजची माहिती रीना यांच्या मैत्रिणीला कळताच या मैत्रिणीने तात्काळ गोरेगाव पोलिस स्टेशन गाठले रीना यांनी त्यांच्या वहिनीला केलेला मेसेज दाखवला त्यानंतर वेगाने सूत्रे हलली पण रीना आपल्या दोन मुलींसह हे जग सोडून गेल्या होत्या.
 
गोरेगाव येथील गावडे कॉम्प्लेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रीना जयमोहन नायर या महिलेने जिया आणि लक्ष्मी या चौदा आणि अकरा वर्षांच्या मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली पहाटे तीन वाजता आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान रीना यांचे यापूर्वी एक लग्न झाले होते पहिल्या पतीपासून एक मुलगी होती तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगी अशा दोन मुली रीना यांना होत्या मात्र रीना या आर्थिक संकटात त्या सापडल्या होत्या. मुलींचं शिक्षण, खोलीचे भाडं या सगळ्यामुळे रीना हतबल झाल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती गोरेगाव पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

धनंजय मुंडेंच्या डोक्यावर टांगती तलवार, राजीनाम्याची मागणी तीव्र, विखे पाटील यांनी दिले हे संकेत

भुजबळ पुन्हा मंत्रिपदावर बोलले, परदेश दौऱ्यानंतर केले वक्तव्य

Savitribai Phule Jayanti भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वाचे कार्य

LIVE: गुरुवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली

लिलाव झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार, फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments