Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रक्तगट जुळत नसतानाही आईच्या किडनी दानामुळे मुलाला जीवनदान

Webdunia
गुरूवार, 4 मे 2023 (18:35 IST)
खारघर येथील मेडिकव्हर रूग्णालयातल कर्जतच्या युवा तरूणावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण
 
विकसित वैद्यकीय उपचारप्रणालीमुळे आता विसंगत रक्तगटातही किडनी प्रत्यारोपण शक्य
 
कर्जत - रूग्ण आणि किडनीदाता या दोघांचेही रक्तगट वेगळे असताना किडनी प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया खारघर येथील मेडिकव्हर रूग्णालयात यशस्वरित्या पार पडली आहे. एका १७ वर्षांच्या मुलाला त्याच्या आईने रक्तगट जुळत नसतानाही आपली किडनी दान करून मुलाला पुर्नजन्म दिले आहे. यामुळे रूग्णाला जीवदान मिळाले असून रक्तगट जुळत नसतानाही शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान डाँ.अमित लंगोटे आणि त्यांच्या टीमेने यशस्वी पार पाडले.
 
धनराज मेंढरे (१७) हा मुलगा किडनी आजाराने त्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे तो ७-८ महिने डायलिसिसवर होता. या मुलाचे वडील नसल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत होती. अशा सर्व अडचणीच्या परिस्थितीतून या मुलाच्या आईने पुढे येऊन रक्तगट वेगळा असतानाही किडनी दान केल्यानं या मुलाला नवीन आयुष्य मिळाले आहे.
 
मेडिकव्हर रूग्णालयातील किडनीविकार तज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. अमित लंगोटे यांनी वेगवेगळ्या रक्तगटाच्या किडनी प्रत्यारोपण करण्याचे आवाहन स्वीकारले. रूग्ण व मूत्रपिंडदाता या दोघांचे रक्तगट वेगळे असतानाही ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.
 
खारघर येथील मेडिकव्हर रूग्णालयातील किडनीविकार तज्ञ आणि किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. अमित लंगोटे म्हणाले की, जेव्हा तो आमच्याकडे आला तेव्हा  हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याचा श्वासोच्छावासही कमी झाला होता. प्राथमिक स्थितीत त्याला किडनीचा आजार असल्याचं लक्षात आले. किडनीमध्ये जी घाण असते ती डोक्यात पोहचून त्याची प्रकृती कोणत्याही क्षणी गंभीर झाली असती. मुलाला फिट्स सुद्धा येऊ शकल्या असत्या. अशा स्थितीत त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करून वैदयकीय चाचण्या करणं गरजेचं होतं. त्यानुसार वैद्यकीय अहवालात किडनीचं क्रिएटिन पातळी खूप जास्त असल्याचं लक्षात आलं. कॅल्शियमचं प्रमाणही खूपच कमी होतं. अशा स्थितीत मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याचं निदान झालं. अशावेळी तातडीने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी कुटुंबियांचे समुपदेशन केल्यानंतर आईने किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, आईचं रक्तगट बी पॉझिटिव्ह होता तर मुलाचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. किडनी प्रत्यारोपणासाठी रक्तगट एकसमान असणं गरजेचं असतं. मात्र रक्तगट वेगळे असतानाही हे किडनी प्रत्यारोपण करण्याचे आवाहन यशस्वीरित्या पार पाडले. आता शस्त्रक्रिया करून दोन महिन्यानंतर रूग्णाची प्रकृती अतिशय उत्तम आहे. हा मुलगा आता पूर्वीप्रमाणे आपली दैनंदिन कामं करू लागला असून बारावीच्या परीक्षेसाठी बाहेरून बसला आहे.
 
डॉ. अमित पुढे म्हणाले की, या मुलाला कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणतीही पूर्व लक्षणे नव्हती. परंतु, जन्मतः या मुलाच्या दोन्ही किडन्या कमजोर होत्या. त्यामुळे या मुलाला किडनी प्रत्यारोपणाची गरज होती. कर्जतमधील मी हे तिसरे किडनी प्रत्यारोपण केले आहे. मागील दीड वर्षांपासून आम्ही डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या रूग्णांना परवडणाऱ्या दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध व्हावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. डायलिसिस केंद्राद्वारे रूग्णांना दुरवर पायपीट न करता जवळ उत्तम दर्जेची सुविधा मिळत असल्याने रूग्णांसाठी हे सोयीस्कर झाले आहे.
 
रूग्णाच्या आईने प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्या मुलाला किडनीचा आजार असल्याचं निदान झाल्याने आम्ही खूप घाबरलो होतो. डॉक्टरांनी आम्हाला प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. पण शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पैसे नसल्याने डॉक्टरांनी आणि रूग्णालयाने आम्हाला सहकार्य केले. मुलाला जीवदान देण्यासाठी मी किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, रक्तगट वेगळे असल्याने शस्त्रक्रिया करणं अवघड होतं. मात्र, अशा स्थितीत डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून मुलाचे प्राण वाचवले आहे. माझ्या मुलाला नवीन आयुष्य दिल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते.

Published By -Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा

निवडणूक निकालानंतर सेन्सेक्स 1290 अंकांनी वधारला, तर निफ्टीने 24300 चा टप्पा पार केला

मेक्सिकोमध्ये एका बारमध्ये गोळीबार, सहा जणांचा मृत्यू

IPL Auction: लिलावात पंत बनला सर्वात महागडा खेळाडू

भाजलेले चणे खाल्ल्यानंतर रक्ताच्या उलट्या झाल्या, आजोबा आणि नातवाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments