Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एमपीएससी परीक्षा निकाल : नाशिकचे भूषण अशोक अहिरे राज्यात प्रथम

Webdunia
शुक्रवार, 17 मार्च 2017 (13:06 IST)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०१६ चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे याने राज्यात प्रथम कमांक पटकावला. सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील हिने महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे.  यात यशस्वी १३० उमेदवारांची यादी आयोगाने जाहीर केली आहे. त्यामध्ये ३४ महिला आणि दोन दिव्यांग उमेदवारांची शिफारसही आयोगाने सरकारकडे केली आहे.

भूषण अहिरे अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर असून त्याची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली आहे. तर पूनम पाटील हिची पोलीस उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता निवड झाली आहे. उपजिल्हाधिकारी पदासाठी भूषण अहिरेसह श्रीकांत गायकवाड, संजयकुमार ढवळे, संदीप भास्के आणि नीलम बाफना यांची निवड झाली आहे. तर पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता पूनमसह अमोल ठाकूर, सागर पवार, अमोल मांडवे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले आहेत.

एमपीएससीतर्फे १० एप्रिल २०१६ रोजी मुंबईसह राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा (पूर्व)परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस १ लाख ९१ हजार ५६३ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे १ हजार ५७५ उमेदवार मुख्य परीक्षा देण्याकरिता यशस्वी ठरले होते. ४१८ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments