Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण

Webdunia
शनिवार, 31 जुलै 2021 (12:53 IST)
औरंगाबादमध्ये वीजबिल वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा खंडित केल्याच्या घटनेवरून तिघांनी मारहाण केल्याचे वृत्त मिळाले आहे.ही घटना अंबरहील आणि माळीवाडा या भागात घडली.
 
महावितरण कंपनीचे सहायक अभियंता संतोष गिरजाबा सुर्वे  हे थकबाकीदारांकडे वसुलीसाठी गेलेले असताना आमचा वीजपुरवठा खंडित का केला असं म्हणत विठ्ठल तुकाराम औताडे,भारत साहेबराव शेजवळ आणि शरद अनिल लोखंडे या तिघांनी त्यांना मारहाण केली.
 
या नंतर सुर्वे यांनी या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देत तक्रार नोंदविली.त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
तर वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र कारभारी वाघमारे आणि दुर्योधन नारनवरे असे दोघे थकीत विज बिल वसुलीकरण्यासाठी गेले असताना त्यांना भारत शेजवळ आणि शरद लोखंडे यांनी वाघमारे व त्यांचे सहकारी नारनवरे यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच त्यांना धक्का बुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.त्यावरुन दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
 

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments