Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुक्ताई नगर : वाढदिवसालाच चिमुकलीचा कुलरचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू

मुक्ताई नगर : वाढदिवसालाच चिमुकलीचा कुलरचा शॉक लागून दुर्देवी मृत्यू
Webdunia
रविवार, 21 मे 2023 (12:28 IST)
जळगाव : मुक्ताई नगर शहरात जिजाऊ नगर येथे शॉक लागून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना 19 मे रोजी ची असून या दिवशी त्या चिमुकलीचा नववा वाढदिवस होता. कुलरचा शॉक लागून या चिमुकलीचा मृत्यू झाला. वैष्णवी चेतन सनासे  असे या मयत मुलीचे नाव आहे. वैष्णवी घरात खेळत असताना कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला. वैष्णवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केले. वाढदिवसा दिवशीच वैष्णवीचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाढदिवसाच्या दिवशी तिचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी तिच्या कुटुंबियांना तिच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. एका हसत्या खेळत्या चिमुकलीच्या एका क्षणातच मृत्यू झाला.घरातील सर्व जण वैष्णवीच्या वाढदिवस साजरा करण्याची जय्यत तयारी करत होते. कोणालाच अशी कल्पना नव्हती की असं काही घडेल. वैष्णवी घरात खेळात असताना तिचा हात कुलरला स्पर्श झाला आणि तिला मृत्यूने गाठले. तिला कुलरचा शॉक बसून तिचा मृत्यू झाला. मुक्ताई नगर परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.   
 
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बची धमकी मिळाली

बॉम्बबद्दल बोलणे पडले महागात, प्रवाशाला अटक तर नागपूर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग

मुंबई : अमेरिकन दूतावासात काम करणारा अधिकारी असल्याचे सांगून महिला डॉक्टरची फसवणूक, गुन्हा दाखल

अमरावती अल्पवयीन मुलीवर अनेक महिने लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक

केरळच्या कुटुंब न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, घबराट पसरली

पुढील लेख
Show comments