Dharma Sangrah

मुंबई: अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका Photo

Webdunia
मुसळधार संततधारेच्या रूपात मंगळवारी कोसळलेल्या वरुणराजाने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही या वेळी ठप्प पडली आणि पाण्यात गेलेल्या मुंबईने पुन्हा एकदा मुंबईकरांना ‘२६ जुलै‘ची धडकीच भरली.

मुंबई-नागपूर दुरोंतो एक्स्प्रेसचे डबे सकाळीच घसरल्याने बाहेरगावी जाणाºया गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यात मुंबईत सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने दुपारनंतर कहर सुरू केला. अवघ्या काही मिनिटांतच चहूबाजूंनी मुंबईला पावसाचा वेढा बसला. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा थांबला. परिणामी, शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचू लागले. अखेर काही तासांतच मुंबईतील रस्ते वाहतूक ठप्प झाली. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
 
येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

EPFO Minimum Pension ईपीएफओच्या किमान पेन्शनमध्ये वाढ होईल का? पेन्शनधारकांना किती फायदा होऊ शकतो?

अजित पवार यांच्या जागी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करेल, मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील

अजित पवार विमान अपघाताची सीआयडी चौकशीचा राज्य सरकारचा निर्णय

IND vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या दिवशी खेळला जाईल

LIVE: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारख्यात बदल

पुढील लेख
Show comments